Ad will apear here
Next
‘प्रत्येक स्त्रीला मैत्रिणी हव्यातच’


पुणे : ‘आपण महिला अनेक गोष्टी मनात ठेवत असतो, या सर्व गोष्टी वेळच्या वेळी व्यक्त झाल्या नाहीत, तर त्याचा आपल्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला मन मोकळे करण्यासाठी मैत्रीणी असणे गरजेचे आहे,’ असे मत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन (फ्लो) या महिलाकेंद्री संस्थेच्या पुणे शाखेतर्फे ‘फ्लो पुणे हाट’ या प्रदर्शनाचे आयोजन पूना क्लब येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. बंड गार्डन रस्त्यावर असलेल्या पूना क्लब क्रिकेट मैदानावर २३ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री नऊ या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या वेळी आर्मी व्हाइवस् वेलफेअर असोसिएशनच्या सदर्न कमांडच्या विभागीय अध्यक्षा नीना सैनी, ‘फ्लो पुणे’च्या अध्यक्षा संगीता ललवाणी, अभिनेत्री दिव्या सेठ शहा, ‘फ्लो पुणे हाट’च्या समन्वयिका स्मिता पटवर्धन, सबिना संघवी, क्रिस्टीन खालसा आदी उपस्थित होत्या.   

सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ‘आज समाज बदलत आहे. गरीब व श्रीमंत ही दरी मिटताना आपण पाहात आहोत. ‘फ्लो पुणे हाट’या उपक्रमाच्या माध्यमातून काही महिला समाजातील विविध स्तरांतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करीत आहेत हे पाहून आनंद झाला. अशाच पद्धतीने एकत्र येत आपण महिलांनी प्रत्येक महिलेच्या पाठीशी आर्थिक, मानसिक व सामाजिक दृष्ट्या उभे राहिले पाहिजे. असे झाले, तरच गरीब श्रीमंत ही दरी कमी होऊन एक समाज आणि पर्यायाने देश म्हणून आपण एकत्र येऊ शकू. पुणे शहराचा विचार केला, तर हे शहर सकारात्मकरित्या बदताना दिसत आहे.’  



ग्रामीण भागातील हस्तकारागीरांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘फ्लो’ या महिलाकेंद्री संस्थेच्या पुणे शाखेतर्फे या दोन दिवसीय ‘फ्लो पुणे हाट’चे आयोजन करण्यात आले असून, याबद्दल बोलताना संगीता ललवाणी म्हणाल्या, ‘कलेचा सन्मान व्हावा या दृष्टीने ग्रामीण कलाकार व कलात्मक महिला या दोहोंनाही एकत्र व्यासपीठ देण्यासाठी आम्ही या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. देशभराच्या कानाकोपऱ्यातून हस्तकारागीर येथे आले असून, त्यांची कला ते या प्रदर्शनात मांडत आहेत. सध्या ‘फ्लो’ ही आशिया खंडातील महिलांनी महिलांसाठी चालविलेली सर्वांत मोठी संस्था असून, देशभरात संस्थेचे सुमारे सहा हजार ८०० सदस्य आहेत हे विशेष.’     

तांब्याच्या वस्तू, वारली व गोंड चित्रे, बांबूच्या वस्तू, खास अशा बंजारा एम्ब्रॉयडरीने सजवलेल्या वस्तू, ज्यूट, कागद व कापडाच्या पिशव्या, हाताने बनवलेल्या चामड्याच्या चपला, दागिने, विणलेल्या साड्या, गोधडी, सौंदर्यप्रसाधने आणि ऑरगॅनिक व पौष्टिक अन्नपदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत; तसेच काश्मिरी एम्ब्रॉयडरीचे प्रात्यक्षिकही कलाकारांकडून दाखवले जाणार आहे. या प्रदर्शनासाठी प्रवेशशुल्क असून, या माध्यमातून जमा होणारा पैसा संस्थेतर्फे गरजू स्त्रियांच्या प्रशिक्षणासाठी राबवल्या जाणा-या प्रकल्पांमध्ये वापरला जाणार आहे.

आर्मी वाइव्हस् वेलफेअर असोसिएशन, स्माइल फाऊंडेशन, वूमन आर्टिसान्स फ्रॉम काश्मीर, अंजुमन-ए-इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र स्टेट रुरल लाइव्हलीहूड मिशन, आश्रय, महाखादी, ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि आयटीआय औंध या संस्थांच्या स्टॉल्सचा या प्रदर्शनात समावेश आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZKXBX
Similar Posts
‘फ्लो’च्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी संगीता ललवाणी पुणे : ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ची (फिक्की) महिला शाखा असलेल्या ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘फ्लो’ या संस्थेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजिका संगीता ललवाणी यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे ‘फिक्की फ्लो’च्या अध्यक्षपदी रितू छाब्रिया पुणे : ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ची (फिक्की) महिला शाखा असलेल्या फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन (फ्लो) या संस्थेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी उद्योजिका आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांची निवड करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या ‘फ्लो’च्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला
‘एससीडब्ल्यूईसी’च्या परिषदेवर संगीता ललवाणी यांची नियुक्ती पुणे : पुण्यातील प्रसिद्ध महिला उद्योजक संगीता ललवाणी यांची सार्क चेंबर वूमन आंत्रप्रेन्य़ुअर्स काऊन्सिल (एससीडब्ल्यूईसी) या संस्थेने आपल्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
‘हिरकणी’च्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी पुणे : आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रायगडाचा दुर्गम कडा उतरून जाणाऱ्या हिरकणीची कथा आजही लहानथोरांना रोमांचित करते. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून वर्षोनुवर्षे भेटणारी ही धाडसी ‘हिरकणी’ येत्या २४ ऑक्टोबरला चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रुपेरी पडद्यावरची ही ‘हिरकणी’ आहे सोनाली कुलकर्णी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language